इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
साऊथम्पटनमधील परिस्थितीचा विचार केला तर या पिचवर 250 रनचा स्कोअर देखील पुरेसा असेल असं भाकित टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असे भाकीत केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला प्रत्येक सेशनमध्ये चांगली बॅटींग करावी लागेल. आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो तर या परिस्थितीमध्ये 250 रन देखील पुरेसे असतील.’ यावेळी त्यांनी रोहित शर्मा आणि शुभमन गिल प्रशंसा केली आहे. ‘विराट आणि अजिंक्यनं चांगली बॅटींग केली. पण मी रोहित आणि शुभमनला अधिक श्रेय देईल. त्यांनी कठिण परिस्थितीमध्ये संयम दाखवला. आम्ही दिवसाचा शेवट चांगला केला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
- ‘पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’, महापौरांचा हल्लाबोल
- इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

