Share

वैजापूर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!

Published On: 

🕒 1 min read

वैजापूर : तालुक्यातील महालगांव येथे विरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असुन एकाच आठवड्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. यात दोन घटना दिवसा घडल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

याबाबत महालगांव येथे (दि.२६) शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान दोन महिला साडी खरेदीसाठी ओम साई साडी सेंटर दुकानात आल्या व अनेक साड्या बघण्यासाठी समोर ठेवल्या असता त्यातील २२०० रुपये किंमतीच्या ६ पैठणी साड्या, ७०० रुपये किंमतीच्या पाच साड्या अंदाजे एकुण पंधरा हजार रुपयांचा माल चोरुन नेतांना एका महिलेस रंगेहात पकडले असल्याचे दुकानदार यांनी सांगितले. ग्राहक बनुन आलेल्या महिला चोर असल्याचे मालकांच्या लक्षात आत्यावर मालकाने त्यांना हटकले असता एका महिलेकडुन तीन साड्या हस्तगत केल्या परंतु तोपर्यंत दुसऱ्या साथीदार महिलेने १५ हजार किंमतीच्या साड्या घेऊन पोबारा केला होता.

हि घटना सीसीटीव्हीत कैद आहे. या घटनेमुळे व्यावसायिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे तरी दुकानदार रजनिकांत नजन यांनी सर्व व्यवसायीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या अगोदर जिल्हा बँकेत खाते उघड्यासाठी आलेल्या एका महिलेचा मोबाईल चोरी गेला आहे तर गंगापुर वैजापूर रोडवरील एचपी भाऊ पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी दगडफेक झाली होती हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वचक नसल्याने समोर येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना भिती मुक्त करून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!