🕒 1 min read
अबुधाबी : पंजाब विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्याची दावेदारी कायम ठेवली आहे. दुबई मध्ये सुरु असलेल्या आयपीएलची रंगत आता वाढताना दिसत आहे. सगळेच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरताना दिसत आहेत. आयपीएलच्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सलग तीन सामने गमवल्यानंतर पंजाब किंग्जवर अखेर दणदणीत विजय मिळवला आहे.
मुंबईच्या टीमनं पंजाबचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं 136 रनचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमधील रंगत आणखी वाढली आहे. या विजयासह मुंबईन प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत. प्रतिउत्तरात कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 6 बाद 135 धावांवर रोखले. नाणेफेक जिंकत रोहितनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याचा हा निर्णय बुमराह व पोलार्डने योग्य ठरवला.
या आयपीएलमध्ये फॉर्मात नसलेल्या इशान किशनच्या जागी सौरभ तिवारीचा समावेश करण्यात आला आहे. रोहितनं याबद्दल सांगितलं की, ‘इशानला टीमच्या बाहेर ठेवणे अवघड होते. पण टीममध्ये बदल करण्याची गरज आहे, असं आम्हाला वाटलं. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यासाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत. असंही रोहितनं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- नाशिकमध्ये जनजीवन विस्कळीत; शहराला महापुराचा धोका,अलर्ट जारी
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- केबीसीमध्ये पुन्हा स्पर्धकाला विचारला चुकीचा प्रश्न?; सोशल मीडियावर होतेय चर्चा
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
