नाशिक : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असून आता नाशिक शहराला महापुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज १५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होऊन मोठा पूर येऊ शकतो. नदीकाठलगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. तसेच जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे.
नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जयंतराव, लोकांना मदत देणं जमणार नसेल तर निदान त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळु नका’
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

