औरंगाबाद : शिक्षकांच्या सातत्याने विलंबाने होत जाणाऱ्या पगारावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या सहकार्याने शिक्षक सेनेने मागणी केलेल्या ‘सीएमपी’ प्रणालीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून एप्रिलचा पगार याद्वारेच करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांना दिली आहे.
या प्रणालीसाठी जिल्हाभरातील शिक्षकांना भारतीय स्टेट बँकेत खाते उघडण्यासंदर्भात प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. बहुतांश शिक्षकांनी आता खाते उघडले असून या संदर्भातील माहिती संकलन व उर्वरित कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यासाठी अधिक दिरंगाई न होता शाळेचे मुख्याध्यापक ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी यातील संपूर्ण यंत्रणेवर कालमर्यादित कार्यवाहीची सुस्पष्ट जबाबदारी निश्चित करून ही प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी शिक्षक सेनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत गोंदवले यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून तातडीने ही कार्यवाही करण्याची ठोस ग्वाही दिली आहे.
या प्रणालीमुळे यापूर्वीच्या वेतन साखळीतील दरमहा होत जाणारा किमान चार-पाच दिवसांचा विलंब कमी होणार असून येत्या तीन महिन्यांत अपेक्षेपेक्षा सुमारे दीड महिन्यांची निर्माण झालेली वेतन विलंबाची तूट प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने भरून निघत शिक्षकांना एक तारखेला वेतन मिळण्याचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा जिल्हाध्यक्ष दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, भगवान हिवाळे,शशिकांत बडगुजर, महेश लबडे, कल्याण पवार,रवी जाधव आदींनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देणाऱ्या भाजपला महाराष्ट्राचं युपी करायचंय का ?’
- प्रशासकीय मान्यता असतानाही जलकुंभाचे काम रखडले, नागरिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा!
- ‘आरोग्य सोडून महाविकास आघाडीची प्राथमिकता काय हे दिसून येतंय !’
- परभणीत राबवणार कोरोेनामुक्त गाव व कोरोनामुक्त परिसर मोहिम!
- शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण, किसान मोर्चाने पाळला ‘मोदी सरकार’ निषेध दिन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

