Share

शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण, किसान मोर्चाने पाळला ‘मोदी सरकार’ निषेध दिन

Published On: 

औरंगाबाद : केंद्रातील मोदी सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील सहा महिन्यांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरू आहे. मात्र मोदी सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी (दि.२६) देशभर मोदी सरकार निषेध दिन पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील विविध संघटनांनी पाठिंबा देत एसएफआयच्या औरंगाबाद जिल्हा समितीने यात सहभागी होऊन मोदी सरकार निषेध दिन पाळला.

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण होत आहे. तसेच, कामगार वर्गांच्या देशव्यापी संपालाही ६ महिने पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे भाजप सरकारलाही याच दिवशी ७ वर्षे पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमिवर संयुक्त किसान मोर्चाने देशभर मोदी सरकार निषेध दिन पाळण्याचे आवाहन केले होते.

या आवाहानाला अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या तिन्ही संघटनांनी सक्रिय पाठिंबा जाहिर केला होता. दरम्यान, या संघटनांनी विविध मागण्या करत मोदी सरकार निषेध दिन पाळला. या आंदोलनावेळी मोदी सरकारने तिन्ही जनविरोधी कृषी कायदे आणि चारही कामगारविरोधी श्रमसंहिता ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात घरे आणि वाहनांवर काळे झेंडे लावून, गावागावांत आणि वस्त्या-वस्त्यांत मोदी सरकारचे पुतळे जाळून देशभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो महिला, युवा आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!