परभणी : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागात कोरोेनामुक्त गाव व कोरोनामुक्त परिसर मोहिम २५ मे ते २५ जून राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ग्रामीण भागात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी एक मोठ्या गावांकरिता दोन ते तीन पालक अधिकारी नियुक्त करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता या उपाययोजनेच्या अनुषंगाने मुख्यतः ग्रामीण भागात कोरोनाच्या अनुषंगाने लक्षणे,त्याचे गांभिर्य वगैरे बाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची व्यापक मोहीम राबविण्यात यावी, यादृष्टीने प्रशासनाने मोठे नियोजन केले आहे. ग्रामीण व शहरी भागात कोरोना मुक्त गाव व परिसर मोहिम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 25 मे ते 25 जून या दरम्यान ग्रामीण भागातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे व शहरी भागात वार्ड व प्रभाग निहाय ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
महापालिका व नगरपालिका क्षेत्रात आयुक्त व मुख्याधिका-यांनी पालक अधिकारी नियुक्त करावेत. त्यांच्याद्वारे गाव किंवा वॉर्डात कोरोना निर्मुलन समिती स्थापन करावी. त्यात ग्रामपंचायत, नगरपरिषद कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक तलाठी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कार्यकर्ते, आशावर्कर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, एनजीओ, कोरोना स्वयंसेवक यांचा समावेश करावा.
रुग्ण व नातेवाईकांना मदत तसेच हहोमआयसोलेश मधील नागरिकांची विचारपूस तसेच लहान मुलांबाबत सर्वोतपरी काळजीबाबत खबरदारी घ्यावी, असे आदेश मुगळीकर यांनी दिले आहेत. कोरोनामुक्त गाव प्रभाग ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याकरिता वर्ग-एक व वर्ग-२ या श्रेणीतील पालक समिती सनियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करावी व योग्य पध्दतीने संपूर्ण महिनाभर मोहिम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण, किसान मोर्चाने पाळला ‘मोदी सरकार’ निषेध दिन
- तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना किती मदत मिळणार ? राज्य सरकारने जाहीर केली आकडेवारी !
- मंत्रिमंडळ बैठकीत ‘पदोन्नती’बद्दल निर्णय नाही, नाराज नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- ‘जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने दारूबंदी उठवली’
- म्युकरमायकोसिसवर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी रुग्णांची माहिती अपडेट ठेवा- जिल्हाधिकारी


