🕒 1 min read
पैठण : पैठण आपेगाव प्राधिकरणातून ७.७० लक्ष लिटरचे जलकुंभ बांधण्याच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिलेली असतानाही केवळ नगरपरिषद व जीवन प्राधिकरण यांच्या समन्वयाअभावी जलकुंभाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या जलकुंभाचे काम लवकर हाती न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
पैठण हे शहर अतिशय प्राचीन ऐतिहासिक पर्यटन व क्षेत्र आहे. नाथ सागर जलाशयाच्या कुशीत असताना ही पैठण नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नाथसागरात भरपूर पाणी असताना ही रंगारहट्टी, नेहरू चौक, दारू सलाम व अन्य भागातील जवळपास वीस हजार लोकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षपासून आहे. त्यातच रंगरहट्टी परिसरातील पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून कोणत्याही वेळी ती कोसळेल अशा अवस्थेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषद तिचा वापर करत आहे.
जनतेची आरडाओरड तीव्र स्वरूपात झाल्या नंतर व लोकांनी संताप व्यक्त केल्या नंतर पैठण- आपेगाव विकास प्राधिकारणातून ७.७० लक्ष लिटर एवढ्या जलकुंभ प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली. त्यानंतरही नगर परिषद व जीवन प्राधिकरण कार्यालयात समनव्य नसल्यामुळे व जलकुंभाची जागा वेळोवेळी बदलण्याच्या घोळामुळे हा जलकुंभ वेळेवर उभा राहू शकला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही नागरिकांना नाईलाजास्तव पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून पैठणकरांना न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आरोग्य सोडून महाविकास आघाडीची प्राथमिकता काय हे दिसून येतंय !’
- परभणीत राबवणार कोरोेनामुक्त गाव व कोरोनामुक्त परिसर मोहिम!
- शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण, किसान मोर्चाने पाळला ‘मोदी सरकार’ निषेध दिन
- तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना किती मदत मिळणार ? राज्य सरकारने जाहीर केली आकडेवारी !
- मंत्रिमंडळ बैठकीत ‘पदोन्नती’बद्दल निर्णय नाही, नाराज नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
