Share

‘पेट्रोल-डिझेलवरील कराचा एकही रुपया कमी होणार नाही’; सीतारामन यांनी सांगितलं ‘हे’ कारण

Published On: 

नवी दिल्ली : इंधनदरवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सर्वसामान्य जनता इंधनदरवाढीमुळे हैराण झाली आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे. अशातच गॅसच्या किंमतीतही दरवाढ होत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्यांची यामुळे आर्थिक फरफट होत असून काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने कर दरात सवलत दिल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होईल, असे वृत्त समोर येत होते. मात्र आता कर कमी होणार नसून याला काँग्रेसच जबाबदार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. इंधनावरील एक्ससाइज ड्युटी (अबकारी कर) कमीकरण्याचा प्रश्नच येत नाही. आधीच्या युपीए सरकराने ऑइल बाँड आणले होते. अजूनही सरकार त्याचे व्याज भरत आहे, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

सरकारने गेल्या ५ वर्षांत ऑइल बाँडवरील ७०.१९५ कोटी रुपयांहून अधिक व्याज भरले आहे. आताही सरकारला २०२६ पर्यंत ३७,००० कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे. व्याज चुकवूनही १.३० लाख कोटींची मूळ रक्कम अजूनही बाकी आहे. ऑइल बाँडचा बोजा नसता तर सरकार इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याच्या स्थितीत असतं, असं त्या म्हणाल्या.

यासोबतच, ‘युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बाँड्स जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. पण मी युपीए सरकारसारखी चलाखी करणार नाही. ऑइल बाँडमुळे सरकारवर बोजा आला आहे. यामुळेच इंधनाचे दर आम्ही कमी करण्यास असमर्थ आहोत,’ असं कारण निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!