सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त केंद्रीय मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेस निघाले आहेत. यादरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जन भाजपवर निशाना साधत जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच असून भाजपने हा शब्द चोरला असल्याचे म्हटले आहे. तसेच नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा इशारा देत राणेंवर टीका केली होती.
यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात बांधली नाही. त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही,’ असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, याची खात्री आम्ही ही घेतली आहे. लोकही घेतील,’ अशी बोचरी टीका करत राणेंनी राऊतांवर पलटवार केला आहे. ‘विनायक राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नाही. मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करेल. राणेंचा पुढच्या जन्मावर विश्वास नाही. आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताच आता शिवसेनेला संपवेल, याची खात्री आहे,’ असं देखील निलेश राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
- कोविड प्रतिबंधाकरीता नागरिकांनीही प्रयत्न करावेत – आदित्य ठाकरे
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
- पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका


