🕒 1 min read
मुंबई : गेल्या दशकापासुन टिव्ही मनोरंजन क्षेत्रात अखंडपणे यशाच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या १३ वर्षापासुन ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने नुकतेच ३२०० भाग पुर्ण केले आहे.
सब टिव्ही प्रसारीत होणाऱ्या ‘तारक मेहता…’ने गेल्या १३ वर्षापासुन प्रेक्षकांचे अंखड मनोरंजन केले आहे. ‘तारक मेहता…’ मालिका माहित नसेल असा प्रेक्षक चुकुनही सापडणे शक्य नाही. गोकुळधाम या सोसायटीतील प्रत्येक कुटुंब प्रेक्षकांचे लाडके बनले आहे. या कार्यक्रमाला सुरुवातीपासुनच उत्तम प्रतिसाद मिळत गेल्याने या मालिकेने ३२०० भागांचा मैलाचा टप्पा ओलांडला. या कार्यक्रमाचा पहिला भाग २८ जुलै २००८ साली प्रदर्शित झाला होता.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1412060922579873794
‘तारक मेहता…’ मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी हा मैलाचा टप्पा ओलांडल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘१३ वर्षाच्या कालावधीत मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे चित्रीकरणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या काळात अनेक चढ उतार पहायला मिळाले. मात्र तरीही न डगमगता कार्यक्रमातील कलाकार आणि कॅमेरामागील इतर सदस्यांनी मेहनत घेतली.’ असे असित मोदी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये – बाळासाहेब थोरात
- भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे – उदय सामंत
- ‘माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील’ ; राठोडांचे सूचक विधान
- मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच बीड नंतर नगरमधील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे !
- ‘या’ अभिनेत्रीमुळे हर्षवर्धन कपूरच्या हातातुन निसटला हॉलिवूडपट, स्वत:च केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

