मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. यानंतर या आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील महिलावर्ग नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
पुढे काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही क्लिप्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र आता पुन्हा हेच संजय राठोड हे मंत्रिमंडळात असायला हवे असे सेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे.
‘संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील,’ असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत केले होते. यावर आता संजय राठोड यांनी देखील भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही,’ असं संजय राठोड यांनी सांगितले आहे.
तसेच ‘उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही,’ असं संजय राठोड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- ‘सत्ता हातून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेण्याची भाषा करावी लागत आहे’
- ‘सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…’; पटोलेंच्या विधानाने आघाडीतील बिघाडी उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

