बुलढाणा – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारापूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला. कराड यांचा समावेश करून मुंडे भगिनींना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही तासांतच बीडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल आहे.
शनिवारी अचानक भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं, पण मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी कार्यकर्त्यांची नाराजी मात्र लपून राहिली नाही.
दरम्यान, भाजपमधील या असंतोषाचा शिवसेना फायदा उचलू पाहत असल्याचे दिसून येत आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील मुंडे भागीनींवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे आणि समोरून येणाऱ्या लोकांना घेतले जात आहे, असा खोचक टोला उदय सामंत यांनी भाजपाला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- केएल राहुल फिरतोय आथिया शेट्टीच्या भावासोबत ; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
- दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम


