Share

खासदारांचा १०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा, वक्फ बोर्ड जमिन प्रकरण

Published On: 

औरंगाबाद : शहराचे खासदार इम्तियाज जलील यांनी जालना रोड वरील वक्फ बोर्डच्या जागेवर तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या घोटाळ्यात शहरातील बड्या धनाढ्यांच्या नावाचा उल्लेख, तसेच तत्कालीन अधिकारी वर्ग यांच्या वर कारवाईची मागणी करत, लवकरात लवकर जागे संबंधी निकाल लागला नाही तर २६ फेब्रुवारी रोजी कार्यकर्ते तसेच नागरिकांना घेऊन ते आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.

जालना रोड वरील वक्फ बोर्डच्या जागेत अनेक दुकाने बांधण्यात आली आहे. त्या जागा वक्फ बोर्डाने भाडेतत्वावर दिल्या होत्या. त्या जागेचे झालेले करार हे बेकायदेशीर असून त्या कारारात शहरातील बड्या धनाढ्य आसामींनी जागा दिल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मा. नगरसेवक राजू तनवाणी, विकासक जुगलकिशोर तापडिया, कैलास बाफना यांचा उल्लेख केला आहे.

यासंबंधी खा. इम्तियाज जलील यांनी सरकार दरबारी पत्र व्यवहार केला आहे. तसेच गृहमंत्री यांना देखील याविषयी माहिती देण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांना दिले आहे. चौकशी पूर्ण होऊन वक्फ बोर्डाकडे जागा हस्तांतरित झाली नाही तर ख. इम्तियाज जलील आमरण उपोषण करणार आहे. आगमी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर हा घोटाळा उघड झाला करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!