बीड : आशाताई आणि अंगणवाडी सेवीकांनी जवळपास १० महिने कोरोना संसर्ग काळात अविरतपणे आपले कार्य चोख बजावले. आपला जीव धोक्यात घालुन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. काही दिवसापुर्वी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोरोना लस निर्माण केली. केंद्र व राज्य सरकारने मोठा गाजावाजा करुन लसीकरणाचा शुभारंभ केला. शुभारंभापुर्वी त्यांनी ड्राय रनही अयोजीत केले होते. प्रत्यक्ष लस आल्यावर लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य हे कोवीड योध्यांना दिले.
या लसीकरण मोहीमेत बीड जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. त्याआधी पुर्वतयारी म्हणून ८ जानेवारी रोजी प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला. यात कोवीडशी संबधित सर्व नियमांचे कठोर पालन करण्यात आले. पण प्रत्यक्ष लसीकरणावेळी मात्र बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला.
शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालयात लस घेतल्यानंतर आशाताई आणि अंगणवाडी सेवीकांना जमिनीवर बसावे लागले. त्यांना बसायला साध्या खुर्च्या देखील नव्हत्या. तसेच या वेळी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, थर्मल गन अशा विविध नियमांची पायामल्ली करण्यात आली. मात्र यावेळी डॉक्टर, परिचारिका यांना बसायला खुर्च्या दिल्या होत्या पण अंगणवाडी सेविका, आशाताई यांना मात्र जमिनीवर बसवण्यात आले होते. या प्रकाराची मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गांभीर्याने दखल घेतली. आणि दुपारनंतर परिस्थीती बदलली.
महत्वाच्या बातम्या
- भारतात प्रथमच येणार ‘या’ कंपनीची ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ कार !
- ‘अण्णा नुसता इशारा नको… होऊन जाऊ द्या… जनता वाट बघत आहे…’
- ‘अण्णांच्या आंदोलनावर बनवाबनवी होऊ नये’; बच्चू कडू यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
- ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी राहुल द्रविडचा खास गुरु मंत्र, अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित
- आता मिळावा 69 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये ‘ही’ कार खरेदी करण्याची संधी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

