🕒 1 min read
तुळजापूर –तालुक्यातील मोर्डा तडवळा भागात एक दिवसाआड विद्युत पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.तरी येथील विद्युत पुरवठा तात्काळ सुरुळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकते राजाभाऊ शेंडगे यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.
आधीच शेतकरी सततचा दुष्काळ आणि आतिवृष्टि अश्या संकटाचा सामना करीत जीवन जगत असताना उदासीन राजकीय नेतृत्वामुळे शेतकरी सगळ्याच बाजूने भरडला जात आहे. त्यातच महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे व शेतकऱ्यांना एक दिवस आड विद्युत पुरवठ्यामुळे शेतकरी संपवूनच टाकायचा असा विढा उचलला आहे कि काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शासनाचे सुध्दा तसेच आहे शेतकरी जगला पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजेत अश्या घोषणा ठोकायच्या आणी त्याच्या उत्पादनात कशी घट येईल याची तंतोतंत नियोजन करायचे असे काम शासन करत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सकाळ संध्याकाळ पोटाला शेतकऱ्याने पिकविलेले अन्नच लागते याचा विसर निश्चितच या अधिका-यांना पडला आहे. शहरी भागाला २४ तास वीज मात्र ग्रामीण भागात व शेतीसाठी मात्र आठ तास वीजपुरवठा हा कुठला न्याय आहे. अशा प्रकारच्या संतप्त भावना ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाकडून व्यक्त केल्या जात आहेत.
तरी या सर्वाचे गांभीर्य वेळीच ओळखून तात्काळ विद्युत पुरवठा नियमित करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल याची संबधितानी नोंद घ्यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ शेंडगे यानी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- कोवीड योध्यांना बसविले जमिनीवर; जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार
- खासदारांचा १०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा, वक्फ बोर्ड जमिन प्रकरण
- ‘जलील यांच्याच घराखाली फायरिंग, चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये’
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

