Share

पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.वाहतूक कोंडीमधून लवकर बाहेर पडावं यासाठी कार चालकांनी चक्क पिस्तूलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.ज्या गाडीतून हे पिस्तूलधारी तरुण फिरत आहेत त्या गाडीच्या मागील काचेवर सत्ताधारी शिवसेनेचा लोगोही पहायला मिळत आहे.

काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

जलील यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं, हे महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आहे. वाहनावरील लोगो हे सर्व सांगते. शुक्रवारी शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करत असताना रिव्हॉल्वर्सचे ब्रँडिंग करती होते. गृहमंत्री / पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!