Share

‘द फॅमिली मॅन -२’ वेब सीरिजला तमिळनाडू सरकारकडूनही बंदी घालण्याची मागणी

Published On: 

मुंबई : मनोज वाजपेयी म्हणजे एक सशक्त अभिनेता. मनोज वाजपेयीने त्याच्या कारकिर्दीत अनेक एकापेक्षा एक सरस चित्रपटात सक्षम अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मनोज वाजपेयी यांची  ‘द फॅमिली मॅन’ च्या पहिल्या भागाच्या यशानंतर मेकर्सनी याच वेब सीरिजचा दुसरा पार्ट भेटीला आणला आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता ही सीरिज वादात अडकल्याचेही पाहायला मिळत आहे.

काही दिवसापूर्वी एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे.

या सीरिजमध्ये तमिळ बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचं कारण देत तमिळनाडू सरकारनं ही वेब सीरिज केवळ तमिळनाडू नाहीतर संपूर्ण देशात प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री संमथा अक्किनेनी ही. संमथा या शोमध्ये राजी नावाची नकारात्मक भूमिका साकारत आहे. तिचे पात्र हे तमिळ लोकासाठी वेगळ्या राज्याची मागणी करताना दिसत आहे. संमथा या चित्रपटात तमिळी आतंकवाद्याची भूमिका साकारत आहे. त्यांचं कनेक्शन थेट पाकिस्तानसोबत जोडण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तमिळ प्रेक्षक नाराज आहेत.

‘द फॅमेली मॅन २ ’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकार असून सध्या मात्र या सीरिजबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!