Share

५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख

Published On: 

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे.

यातच आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. लॉकडाऊन शिथीलतेसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो. पण, सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपी प्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे अस्लम शेख म्हणाले.

दरम्यान, तिसरी लाट येणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. तसेच ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत, अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही. परंतु, सर्वसामान्यांना दिलासा देणाचा विचार सरकारचा आहे. याबाबतची नियमावली कॅबिनेटनंतर जाहीर करण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले.

दरम्यान, मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर देखील ठाकरे सरकारने राज्यातील स्थिती लक्षात घेता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला होता. यावेळी देखील कडक निर्बंध हे टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून १ जूननंतर लॉकडाऊन न वंध्यत्वत व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!