Share

तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले

Published On: 

🕒 1 min read

कराड : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले असून सत्ताधारी नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल डझनभर मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केल्याने सत्ताधारी नेते चांगलेच घायाळ झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जिल्हाबंदी घालण्यात आल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मुंबईतच पोलिसांनी त्यांना घराबाहेर जाण्यापासून अटकाव केला होता. हे बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुश्रीफ यांचा मोठा भ्रष्टाचार बाहेर आल्यास सरकारचं काही खरं नाही म्हणून मला दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सोमय्या यांनी काल केला होता. काल दुपारनंतर सुरु झालेला नाट्यमय प्रकार आज देखील सुरु असल्याचा पाहायला मिळाला.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तिखट शब्दांत सोमय्या यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात संपलेल अस्तित्व आणि स्वतःच्याचं पक्षात संपुष्टातं आलेली कारकीर्द पुन्हा प्रस्थापित करण्याचा सोमय्या यांचा केविलवाणा तमाशा सुरु आहे. सोमय्या यांची अवस्था पडद्यामागच्या नेत्यांनी “न घर का न घाट का” अशी दयनीयं करून ठेवली आहे. नुसता तमाशा’ असं ट्विट मिटकरी यांनी केलं होतं.

मिटकरी यांच्या टीकेचा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी चांगलाच समाचार घेतलाय. ‘तमाशा ही कला महाराष्ट्राच्या जनतेने आश्रय दिलेली लोककला आहे. परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार. त्या कलेचा तुम्ही अपमान करू नका महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा तमाशा तुमच्या पक्षाने केला आहे,’ असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी करत मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!