बीड : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम आणखीन एका दिवसाने वाढला आहे. उद्या मंगळवारी जामीन अर्जावर निकाल देण्यात येणार आहे. आज सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यालायासमोर झाला. यामुळे त्यावर निर्णय येणे अपेक्षित होते. पण न्यायालय मंगळवारी जामीन अर्जावर निकाल देणार असल्याचे शर्मा यांचे वकील जयंत भारजकर यांनी सांगितले.
राज्यात चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा प्रकरणी, अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करून आपापली बाजू मांडली. यावेळी यावेळी करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचे कृत्य करू नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली. शर्मा यांची ऍड.भारजकर यांनी बाजू मांडली होती तर सरकारच्या वतीने अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले होते. आज सोमवारीही न्यायालयाचे कामकाज झाले. मात्र यावरची अंतिम सुनावणी व जामीन अर्जावरील निर्णय आता मंगळवारी होणार असल्याने करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम एक दिवसाने वाढला आहे.
नेमकी घटना काय?
करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे दि. ५ सप्टेंबर रोजी आल्या होत्या. परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या. पण या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, करुणा यांना गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे अटक करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला. त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली. ज्यावर आज सुनावणी पार पडली असून कोर्टानं निकाल राखीव ठेवला आहे. आता कोर्ट काय निकाल देणार ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

