🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर नवीन सरकार आले आहे. अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजप पक्षाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, प्रासंगिक करार आहे यांची माहिती भाजपलाही आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. २०२४ पूर्वीच निवडणुका होतील असे मला वाटत आहे. त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचे हे, भाजप ठरवेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यानंतर आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असणार कोणाला कोणती पद मिळणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालेय. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहाता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेय.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
