Share

‘राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला.

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांस देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव आहे, हे समजत नाही. विरोधी देशास आनंद वाटावा, असे वक्तव्य करणे हे देश विरोधात कृत्य आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, अशी झुंडशाही या सरकारची आहे. त्यामुळे आम्ही आता स्वस्थ बसणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर काठ्या मारल्या पाहिजेत, हे काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोड्याने मारले पाहिजे, हे वक्तव्य आम्ही सहन केले. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबतवक्तव्य करताना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यावर पडदा पडल्यानंतर झालेली कारवाई चुकीची आहे, असा दावाही शेलार यांनी केला.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक ही राज्य सरकारच्या झुंडशाहीचे लक्षण आहे. राज्य सरकारने आता सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा शेवट आम्हीच करू, असा इशारा देत सरकारच्या तुघलकी कार्यपद्धतीचा निषेध व धिक्कार आहे. राज्य सरकारची झुंडशाही व महाराष्ट्र पोलिसांचा गैरकारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!