अकोला : कोरोनामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा सामना करताना राज्य सरकारवर मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे आता या लढ्यात लोकप्रतिनीधीही सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. राज्य सरकारला मदत म्हणून माजी आमदार एका महिन्याचे मानधन देणार आहेत. याबाबत माजी आमदार समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
आरोग्य यंत्रणा उभारण्यासह अन्य बाबींसाठी शासनाला प्रचंड खर्च करावा लागतोय. तसेच लॉकडाऊनमुळे कर संकलनातही घट झाली आहे. त्यामुळे राज्यावर कोसळलेल्या संकटात माजी आमदारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील १५०० च्यावर माजी आमदार कोरोना रुग्णांच्या लढण्यासाठी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. कोरोना बाधितांच्या उपचारार्थ व इतर उपाययोजनांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निधी राज्यातील १५०० च्यावर माजी आमदारांच्या एक महिन्याच्या मानधनातून कपात करून घेण्याची विनंती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही समितीने राज्य सरकारला एक महिन्याचे माधन देवून आर्थिक मदत दिली होती. माजी आमदारांची संख्या व त्यांना मिळणारे एक महिन्याचे मानधन लक्षात घेता साधारण ७.५ कोटींपेक्षा जास्त निधी कोरोना निधीत जमा होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत मुलीचा विनयभंग, आरोपीला तीन वर्षांची शिक्षा
- ‘खा.हीना गावित स्वत:च्या नादात मोदींचा करिश्मा विसरल्या’
- ‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

