🕒 1 min read
जळगाव : मुक्ताईनगरचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे कुटुंबीयांत राजकीय संघर्ष सुरू आहे. विविध कारणांनी हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील नागेश्वर मंदिराकडून जुने कोथळीतील मुक्ताई मंदिराकडे जाताना, निंबादेवी मंदिराजवळील पूल व त्यासाठीचा निधी माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी नाबार्ड अंतर्गत मंजूर करून आणला.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. त्याऐवजी मतदार संघातील मेळसांगवे-पंचाणे मार्गे सुलवाडी ते ऐनपूर रस्त्यावरील पूल मंजूर करुन आणावा. तसे केल्यास आम्ही जाहीर सत्कार करू, त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जुने मुक्ताईनगरातील नागेश्वर मंदिराकडून जुन्या मुक्ताबाई मंदिराकडे जाताना रस्त्यात ढासळलेला पूल आहे. तेथे नवीन पूल उभारणीचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावर त्या म्हणाल्या की, निंबादेवी मंदिराजवळ मोठ्या पुलाची पुनर्बांधणीसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार असतानाच तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाबार्ड अंतर्गत पाठपुरावा केला. त्यानुसार पुलासाठी २०१९ मध्ये दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. तो निधी आल्यावर आमदार पाटील यांनी भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी स्वत:च्या कामांचे श्रेय घ्यावे. नाथाभाऊंनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
महत्वाच्या बातम्या
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
- ‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा


