Share

‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’

Published On: 

भुसावळ : ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला’, असं चंद्रकात पाटील पश्चिम बंगालच्या निकालानंतर म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावरून भुजबळ समर्थकांमधून संताप व्यक्त होत आहे.

राज्याचे मंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल अतिशय उद्धट आणि मगरुरीच्या भाषेत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र माळी समाज महासंघ, समता परिषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन वरणगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.

छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालाबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना अतिशय उद्धट भाषेत धमकी दिली. मंत्री भुजबळ यांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, तसेच पाटील यांच्यावर गुन्हाही दाखल करावा. असे निवेदनात नमूद केले आहे. भुजबळ यांच्यासोबत संपूर्ण ओबीसी समाज असून वेळ पडल्यास तो रस्त्यावरही उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!