🕒 1 min read
अकोला : दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. अनिल भगवान सोळंके (रा. माना, ता.मूर्तिजापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, ७ मार्च २०१४ रोजी पीडीत मुलगी ही इयत्ता १० वीचा इंग्रजीचा पेपर देण्यासाठी परिक्षेला जात होती. या वेळी आरोपीने तिला रस्त्यावर अडवून तिचा हात धरला आणि ‘तू माझ्याशी लग्न का करत नाही’, अशी विचारणा केली. मुलीने त्याचा हात झटकून टाकला आणि ती परीक्षेला गेली होती. पेपर देऊन आल्यानंतर तिने सायंकाळी आई-वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिल सोळंके याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
पीडित मुलीचे वडील व आरोपीचे यापूर्वी भांडण असल्या कारणाने जाणीवपूर्वक खोटी तक्रार देण्यात आली असा युक्तीवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. पण या संदर्भात कोणताही सबळ पुरावा आरोपी पक्ष न्यायालयात सादर करू शकले नाही. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्ष आणि आरोपी पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खा.हीना गावित स्वत:च्या नादात मोदींचा करिश्मा विसरल्या’
- ‘भुजबळांना धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा’
- ‘चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊंच्या कामाचे श्रेय घेऊ नये’, रोहिणी खडसेंचा टोला
- इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली कृषी सहायकाला ३३ लाखांचा गंडा
- ‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’


