पुणे : शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. जेथे पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे तेथे परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती, राज आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर !
- नेताजींच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदींची आदरांजली !
- मुंबई लोकलमध्ये जागा मिळवणे कठीण की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे? शार्दुल म्हणाला.
- ‘…तर आज मी दुसरा सचिन तेंडुलकर असतो’
- ‘ब्राझीलसाठी भारत ठरला ‘नवसंजीवनी’ देणारा ‘हनुमान’ !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

