Share

मुंबई लोकलमध्ये जागा मिळवणे कठीण की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे? शार्दुल म्हणाला.

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलियावर शानदार कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज भारतात परतली. या दौऱ्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या दौऱ्याचा शेवट ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने गोड केला. विशेष या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.

या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. ब्रिस्बेन येथे भारताने मिळवलेल्या विजयात पालघरच्या वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचे योगदान मोठे होते.

विशेष म्हणजे शार्दुल २ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळत होता. त्यानेही या संधीचा उपयोग करत शानदार कामगिरी केली. त्याने ब्रिस्बेन कसोटीत अर्धशतकी खेळी केली. तसेच गोलंदाजीतही चमक दाखवली.

शार्दुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याने इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्याला गमतीने प्रश्न विचारण्यात आला होता की ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करणे कठीण आहे की मुंबईच्या लोकलमध्ये जागा मिळवणं. यावर शार्दुलनेही कोणतीही वेळ न दवडता मजेशीर उत्तर दिले, की मुंबई लोकलमध्ये जागा मिळवणे जास्त कठिण आहे. त्यापेक्षा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणे सोपे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!