कोलकाता: महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी ट्वीट करत नेताजींच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदींची आदरांजली अर्पण केली आहे.
महान स्वतंत्रता सेनानी और भारत माता के सच्चे सपूत नेताजी सुभाष चंद्र बोस को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन। कृतज्ञ राष्ट्र देश की आजादी के लिए उनके त्याग और समर्पण को सदा याद रखेगा। #ParakramDivas
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
नुकतच नेताजींचा जन्मदिन आज आणि या पुढे ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला. याबाबत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने माहिती दिली आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी नेताजींच्या निमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नॅशनल लायब्ररी ला भेट देतील तसेच विक्टोरिया मेमोरियल मध्ये राहणार असून नेताजींच्या पत्रांवर आधारित एका पुस्तकाचे अनावरण करतील. नेताजींचे निधन आणि त्यांचे हे पत्र अत्यंत संवेदनशील मानले जातात. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेच्या सदस्य यावेळी मोदी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
त्याचबरोबर यावेळी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मानती राजनाथ सिंह, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनेर्जी यांनी देखील नेताजींना आदरांजली अर्पण केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- ‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
- सिनेमातील ‘नायक’ सत्यातील ‘सृष्टी गोस्वामी’; एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान विद्यार्थिनीला !
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

