Share

‘ब्राझीलसाठी भारत ठरला ‘नवसंजीवनी’ देणारा ‘हनुमान’ !’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : करोनाची लस घेण्यास ब्राझीलच्या राष्ट्रपतीनी जेअर बोलसोनारो यांनी “आपण करोनाची लस घेणार नाही. तो माझा अधिकार आहे,” अस अजब विधान केल्या नंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

त्यांनतर डिसेंबरमध्ये अमेरिका आणि इग्लंड मध्ये करोना लासिकारणाला सुरुवात झाली. भारतात नववर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. यानंतर १६ जानेवारी पासून भारतात लसीकरण मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली होती.

ब्राझीलकडून करण्यात आलेल्या या मागणीला भारताने एक मित्र राष्ट्र म्हणून मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून ब्राझीलला लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले. “जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,” असं म्हणत बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!