Share

‘…तर आज मी दुसरा सचिन तेंडुलकर असतो’

Published On: 

मुंबई : भारता मध्ये जेवढे क्रिकेट प्रेमी  प्रमाणेच डब्ल्यूडब्ल्यूईचे प्रेमी आहेत. डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्स भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक येतो तो म्हणजे ट्रिपल एचचा. ट्रिपल एच आपली बॉडी व एकूणच रिंग मधील कामगिरमुळे सर्व डब्ल्यूडब्ल्यूई प्रेमींचा चहिता आहे. ट्रिपल एच सध्या डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळाडू म्हणून सहभाग न घेता, व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहे. अशातच एका कार्यक्रमादरम्यान ट्रिपल एचने क्रिकेटबद्दल आपली आवडव्यक्त केली असून, त्याच्यामते जर तो क्रिकेट खेळत असता तर सचिन प्रमाणेच उत्तम खेळाडू असता.

एका कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने ट्रिपल एचला क्रिकेट संदर्भात प्रश्न विचारला असता तो म्हणाला ,’माझ्यामते मी कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो. जर मी क्रिकेटला माझं करिअर निवडलं तर मी क्रिकेटमध्ये देखील सर्वोत्तम असतो. मी सचिनसारखा नाही पण सचिन प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला असता. कदाचित मी पुढचा सचिनही झालो असतो.’

ट्रिपल एचचा इंटरव्यू मोठ्या प्रमाणावत व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना फार आवडला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भारतीयांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!