जालना : जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमेडिसेविर इंजेक्शनचा तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, या दृष्टीने नियोजन करण्याबरोबरच रेमेडिसेविर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री म्हणाले, की कोरोनाबधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमेडिसेविर इंजेक्शन्सचा पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात साठा उपलब्ध असणार आहे. तर यासाठी याची पुरेशी मागणी नोंदवण्यात यावी. जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक इंजेक्शनचा हिशोब ठेवावा. इंजेक्शन्स सर्व सामान्यांना चढ्या भावाने विक्री होणार नाही आणि याचा काळाबाजार होणार नाही तसेच जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री म्हणाले की, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे त्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावते. अनेकवेळा रुग्णांचा मृत्यू देखील होतो. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात येऊन कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक


