🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षी मनसेतून राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रुपाली पाटलांच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच पक्ष सोडून देखील रुपाली यांनी त्यांच्या जुन्या फेसबुक पोस्ट डिलिट केल्या नाही. यावरूनही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. दरम्यान, आज (१ एप्रिल) एक फेसबुक पोस्ट शेअर करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रुपाली म्हणाल्या आहेत की, ‘मी गेले १४ वर्ष राजकारणात काम करत आहे. राजकारणात,समाजकारण करत असताना मी केलेल्या सर्व पोस्ट माझ्या फेसबुक आहेत. पूर्व पक्ष मनसे होता तेव्हा ही एक पदाधिकारी म्हणून चोख आणि दमदार काम केले आता तर पक्ष बदलला आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे. तरी सुद्धा पोस्ट डिलीट नाही केल्या आणि करणार सुद्धा नाही.’
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/7469915686382064
पुढे त्या म्हणाल्या की,‘मी राजमाता जिजाऊ आईसाहेब,राजमाता आहिल्या बाई होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्री माता,रमाई आईची लेक आहे. त्यावेळी जी परिस्थिती होती जे कर्तव्य होते ते अगदी दमदार केले. जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो तुमचे नेते आधी शिवसेने सोबत होते त्या पोस्ट काढा ,तुम्ही दुसऱ्या पक्षातील लोक घेतले त्यांच्या पोस्ट काढा.’
दरम्यान, ‘कोणत्या पक्षात राहायचे ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून अशा लोकांचा काहीही फरक पडत नाही. भुका भुका अजून भुका काम दिलंय तर भूकले पाहिजे सोशल विकृत ट्रेंड भुंकणे’, असेही त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत अमोल मिटकरींनी दिल्या ‘एप्रिल फुल’च्या हटके शुभेच्छा
- “…पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- CRZ चे नियम धाब्यावर बसवत गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी; नितेश राणेंचा आयुक्तांना इशारा
- IPL 2022: रिश्तों के भी रूप बदलते है! सामना संपल्यानंतर दिसला धोनी- गंभीरचा ‘याराना’
- Pariksha Pe Charcha : “आगामी परीक्षेचा वेळ तुमच्या रुटीनप्रमाणेच…”, मोदींनी दिल्या विद्यार्थ्यांना ‘या’ टिप्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
