🕒 1 min read
मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील व्हिविंग गॅलरीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी केला आहे. नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
“जनतेच्या पैशाचा गैरवापर करत, सर्व CRZ चे नियम धाब्यावर बसवत अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी मुंबई महापालिका गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी करतेय. यावर आयुक्तांनी MRTP ACT नुसार कारवाई करावी अन्यथा या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईसंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल.”, असा इशारा नितेश राणे यांनी ट्वीट करत दिला आहे.
मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे, ही आमचीपण भूमिका आहे पण पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापाई पैशांचा गैरवापर होत असेल, तर याला आमचा विरोधच राहणार आहे. असेही राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्या वर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची व्हिविंग गॅलरी उभारण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत अमोल मिटकरींनी दिल्या ‘एप्रिल फुल’च्या हटके शुभेच्छा
ट्वीटरवर होतोय ‘BoycottHimalaya’ ट्रेंड; नेमके कारण काय?
“अच्छा सिला दिया तूने…”, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
