🕒 1 min read
मुंबई: गुरुवारी CSK आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामना झाला. जो चेन्नईने गमावला. मात्र सामन्यानंतर एकेकाळी कट्टर वैरी मानले जाणारे गौतम गंभीर आणि एमएस धोनी एकत्र गप्पा मारताना दिसले. सामन्यात लखनऊने सीएसकेचा ६ गडी राखून पराभव करत या मोसमातील आपले खाते उघडले आहे. पण, CSK च्या हाती अजूनही निराशा आहे. पण, या पराभवानंतरही गौतम गंभीर आणि एमएस धोनी ज्या पद्धतीने बोलताना दिसले, त्याने चाहत्यांचीही मने जिंकली आहेत.
ब्रेबॉन स्टेडियमवर झालेला सामना CSK च्या पराभवाने संपला. पण, या दोन भारतीय दिग्गजांमधील संवाद पाहून चाहत्यांच्या हृदयाला एक वेगळाच दिलासा मिळाला आहे. असे बऱ्याचदा घडते सामन्याचा निकाल काहीही लागो, पण मैदानानंतर दोन प्रतिस्पर्धी एकमेकांचा बंधूभाव दाखवताना कॅमेऱ्यात कैद होतात. असाच काहीसा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. चेन्नई आणि लखनऊ सामना संपल्यानंतर, CSK माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (gautam gambhir) एकमेकांशी बोलताना कॅमेरात कैद झाले. हे दृश्य पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
यामागे एक प्रमुख कारण हे देखील आहे की या दोघांमध्ये कटू संबंध असल्याच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये येत असतात. त्यामुळेच हे दृश्य बघता दोघांच्या नात्यात खरंच अंतर आहे का, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. या दोघांचे सामन्यानंतर बोलतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर खुद्द गंभीरनेही फोटो पोस्ट करत ‘तुला भेटून चांगले वाटले स्किपर’ असे धोनीसाठी लिहले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारीचा तपास ED, CBI कडून व्हायचा बाकी- संजय राऊत
- कोरिओग्राफर गणेश आचार्य विरोधात लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल
- April Fool’s Day : कधीपासून साजरा केला जातो ‘एप्रिल फुल डे’? जाणून घ्या सविस्तर
- IPL 2022: आज पंजाब विरुद्ध कोलकाता सामना रंगणार; जाणून घ्या कोणता संघ आहे बलाढ्य
- CRZ चे नियम धाब्यावर बसवत गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी; नितेश राणेंचा आयुक्तांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
