🕒 1 min read
मुंबई: हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने कोवॅक्सिन लस उत्पादित करण्याच्या प्रकल्पाला अर्थसहाय्य करायला आणि उत्पादनाच्या तंत्रज्ञानातील काही आवश्यक बदल करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. मात्र यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.
“केंद्र सरकारच्या सक्रिय पुढाकाराने व राज्य सरकारच्या सहकार्याने हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये कोव्हॅक्सिन लस उत्पादन प्रकल्पाने चांगलाच वेग घेतला आहे. पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
दरम्यान या बैठकीत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ११० दशलक्ष लस मात्रा समान कोव्हॅक्सीन Drug Substance उत्पादनासाठी १२६.१५ कोटी रुपये इतक्या सुधारीत अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली असून यामध्ये केंद्र शासनाचा ७०.०७ कोटी रुपये व राज्य शासनाचा ५६.०८ कोटी रुपये इतका हिस्सा आहे. यावेळी मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घ्यायलाही मान्यता देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ट्वीटरवर होतोय ‘BoycottHimalaya’ ट्रेंड; नेमके कारण काय?
“अच्छा सिला दिया तूने…”, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“राहुल गांधींना ना भाजपच्या या एजन्सींचा धाक आहे ना…”, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार- राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
