Share

भाजपा आयटी सेल व इतर समाजकंटकांवर कारवाईसाठी सचिन सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशपातळीवर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमातून अपप्रचार केला जातो. यामागे भाजपचे नेते तसेच भाजपचे आयटी सेल कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपाच्या आयटी सेलकडून तसेच इतर समाजसंटकांकडून होणाऱ्या अपप्रचाराविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. देश पातळीवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम समाजमाध्यमातून केले जात आहे. तसेच यामागे भाजप आणि भाजपचा आयटी सेल आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

लोकांमध्ये द्वेष पसरवणे, जाणीवपूर्वक ट्रोल करणे, खोट्या बातम्या पसरवणे, इतर नेत्यांचे चारित्रहनन करणे इत्यादि काम भाजपचे आयटी सेल करत असते. यासाठी भाजप हजारो कोटी रुपये खर्च करते. यासाठी त्यांनी काही खाजगी कंपन्या नियुक्त केल्या आहेत, असं सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.सायबर कायदा बऱ्याच अंशी कमजोर झाला आहे. याचाच फायदा भाजपची मंडळी घेत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते तर समाजमाध्यमातून खुल्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा ,समाजमाध्यमात वापरत असतात. यातून देशाची आणि राज्याची सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे या अपप्रचारावर नियंत्रण आणून समाजकंटकावर कारवाईचा विचार व्हावा,’असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!