🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटामध्ये काम केल आहे. नुकतेच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिचे वजन अधिक वाढले होते. त्यानंतर आता तिने स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यांचं दिसत आहे. करिनाने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे.
‘रामायण’ या चित्रपटातील सीतामातेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी करीनाला निवडायचं ठरवलं पण करीनाची फी ऐकून निर्मातेही मोठ्या गोंधळात पडले. या रोल साठी करीनाने तब्बल १२ कोटी रुपायांची मागणी केली. तसे तर करीना एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपये मानधन घेते. यामुळे या चित्रपटाचे शुटिंग लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता करीनाला ट्रोल करण्यात आले आहे.
https://twitter.com/manuyadavbjp/status/1403603087256788992?s=20
“सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा आहे. हिंदू लोकांसाठी आदरास्थानी असलेल्या सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीनासारखी लालची अभिनेत्री घेणं चुकीचं आहे. या भूमिकेसाठी एक हिंदूच अभिनेत्री घ्या.” अशी मागणी नेटकरी करत आहेत. तसेच #BoycottKareenaKhan असं म्हणत तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. अजून या चित्रपटाविषयी निर्मात्यांनी कोणतही अधिकृत विधान केले नसून लवकरच याविषयी घोषणा केली जाणार असण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/immortalsoulin/status/1403594811458740230?s=20
करीना ‘वीरे दी वेडींग’ आणि हंसल मेहतांच्या आणखी एका चित्रपटासाठी ती काम करत आहे. याशिवाय करीना करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही दिसणार आहे. आमिर खान सोबत लवकरच ती ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटातही झळकणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
