Share

घ्या दर्शन, आजच्या करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या महासरस्वती रूपातील मनमोहक पूजेचं !

Published On: 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.

महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असून नवरात्रोत्सव काळात सर्व धार्मिक विधी मात्र परंपरेनुसार पार पडत आहे. मंदिर व्यवस्थापनांनी देखील इतर माध्यमांमधून भक्तांच्या दर्शनाची सोय केली आहे. आज नवरात्रोत्सवाची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस! या निमित्ताने करवीरनिवासिनी अंबाबाईची महासरस्वती रूपातील खास पूजा बांधण्यात आली आहे.

घ्या जाणून आजच्या पूजेचं महत्व –

आज अश्विन शुद्ध सप्तमी. आजच्या दिवशी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की करवीर निवासिनीच हे मंदिर त्रिकूट प्रासाद म्हणून ओळखलं जातं हे मंदिर फक्त एकट्या महालक्ष्मीचे नसुन महाकाली आणि महासरस्वती या तिघींच आहे.

तिघींचे तीन स्वतंत्र मंडप गाभारा आणि प्रदक्षिणा युक्त मंदिर आहे. आज या मंदिरात दक्षिणाभिमुख महाकाली ची विराजमान मूर्ती ही चतुर्भुज महिषासुरमर्दिनी रुपात आहे जी करवीरची शक्तीपीठ देवता आहे महाष्टमीचा होम हिच्यासमोरच संपन्न होतो. तर महासरस्वती ची मूर्ती ही चतुर्भुज आणि बैठी असून अभय अंकुश पाश वरद अशी आयुधे व मुद्रा धारण करते. या तिघींचेही दर्शन महर्षि अगस्तींनी घेतले होते करवीरच्या क्षेत्र स्वामिनीबरोबरच तिच्या या दोन प्रधान प्रकृतींचेही आपण यथासांग पूजन करून त्यांची कृपा प्राप्त करू हिच अपेक्षा ! ही माहिती प्रसन्न मालेकर व प्रसन्न जोशी यांनी दिली आहे.

आजच्या पूजेचा फोटो-

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!