Share

तुम्ही एकदा याचं जळगावात ! तुम्हाला नाथाभाऊची ताकत दाखवतो

Published On: 

मुंबई:साहेब सध्या कोविडचा प्रादुर्भाव आहे म्हणून. नाहीतर या ठिकाणी गर्दी मावली नसती.आताच मी तुम्हाला आमंत्रण देतो हे सगळं एकदा निवळू द्या.आणि मग ‘तुम्ही एकदा याच जळगावात ! तुम्हाला नाथाभाऊची खरी ताकत दाखवतो’ अशी दमदार सिंह गर्जना भाजप बंडखोर आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवासी झालेले नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत केली.

आज खडसे यांचा पक्षप्रवेश वाय.बी.चव्हाण सेंटर,मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की ‘ मला थेट दिल्लीश्वरांनी सांगितले होते की तुमचं भाजप मधलं काम आता संपलय तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जा ! त्यावेळी पवार साहेबांना मी हे सांगितलं देखील होतं.पण साहेबांनी तडका – फडकी निर्णय घेण्यापेक्षा जरा सबुरीने घ्या असं सांगितलं होतं.

मी आज पवार साहेबांचा खरचं खूप आभारी आहे.मला पक्षात स्थान दिलं.आता यांना माझी ताकत कळेल.सध्या कोविड आहे म्हणून एकदा याचा प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम घेऊ असं खडसे यांनी पुढे म्हटलं.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते पण शरद पवारांनी कुणीही नाराज नाही.असं स्पष्ट सांगितलं म्हणून राष्ट्रवादीत सगळ आलबेल आहे असे आपण म्हणू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!