🕒 1 min read
मुंबई- गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यातील सर्व भ्रष्ट नेत्यांसाठीचे माहेरघर असणारा पक्ष. त्यामुळे भाजप नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडताना आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय दुसरा पक्ष असूच शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
भाजप सरकार असताना आम आदमी पक्षाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत त्यांचे झालेले संभाषण याचे पुरावे देऊन देखील त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकार सुद्धा त्यांना सोईस्कर क्लीन चिट देईल यात शंका नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
प्रिती शर्मा मेनन यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. त्या म्हणाल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याची हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे कि भाजपमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना कुठलेही स्थान असू शकत नाही, हा पक्ष केवळ पक्ष वाढीसाठी बहुजन समाजाच्या नेत्यांना वापरून घेतो.
हे आपण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर भाजप शासित राज्यात बघत आहोत.आपण बघत आहोत भ्रष्ट दलबदलू नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी उड्या मारत आहेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सत्ता पक्षात दाखल होताच केराच्या टोपलीत टाकल्या जातात. राज्यातील जनतेने या भ्रष्ट दलबदलू नेत्यांना कायमचा धडा शिकविण्याची वेळ आली आहे असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
- पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बेपत्ता
- ‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’
- दमानिया यांच्या गंभीर आरोपांवर खडसे सोडणार आज मौन?
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
