Share

आता रक्षा खडसे यांनी देखील भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादीत यावं : अनिल पाटील

Published On: 

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सगळ्यांना धक्का दिला. त्यांनतर त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जात असल्याची घोषणा केली. आज दुपारी ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. खडसे कालच मुंबईमध्ये दाखल झाले असून काही मोजकेच समर्थक त्यांच्यासोबत आहेत.

खडसेंपाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील घड्याळच हाती बांधलं आहे. भाजपमधील जवळपास १५ आमदार आपल्या संपर्कात असून ते देखील भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला होता. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खडसे काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांच्यातील बैठक संपवून ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित झाले आहेत. एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीची वाट धरली असली तरी एकनाथ खडसेंच्या सुनबाई व भाजप खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच आहेत. अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी रक्षा खडसेंनी देखील राष्ट्रवादीत यावं अशी साद घातली आहे. पक्षप्रवेशाचा सोहळा सुरु झाला असून अजूनही खडसेंच्या मंत्रिपदावरून वा इतर जबाब्दारीवरून कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!