मुंबई – सीबीआयच्या चौकशीला घाबरून राज्यसरकारने निर्णय घेतला अशी ओरड भाजपाचे काही अज्ञानी प्रवक्ते करत आहेत त्यांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
सीबीआयला तपास करताना यापुढे राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे आणि त्यातूनच राज्यसरकारवर टिका करत सुटले आहेत.
दिल्ली विशेष पोलीस अधिनियम १९४६ मधील कलम – ६ च्या तरतुदीनुसार चौकशी करायची असेल तर संबंधित राज्याची परवानगी बंधनकारक व अनिवार्य आहे याचे साधे ज्ञान भाजपच्या प्रवक्त्यांना नसावे याचे आश्चर्य वाटते असेही महेश तपासे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यांमध्ये दिलेल्या निर्णयांमध्ये दिल्ली विशेष पोलीस अधिनियम १९४६ मधील कलम – ६ नुसार राज्यशासनाच्या पूर्व संमतीशिवाय सीबीआयला या अधिकाराचा वापर करता येणार नाही याचा संदर्भ महेश तपासे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- प्रवाश्यांना मोठा दिलासा; नांदेड-पनवेल व्हाया लातूर विशेष रेल्वे सेवा झाली सुरु
- बिहारमध्ये सत्ता नाही आली तर भाजपा गोर गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का?
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे ! भारतीय नौदलात महिला वैमानिकांची पहिली तुकडी कार्यरत
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ‘या’ तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन


