🕒 1 min read
बीड : खासदार डॉ.प्रीतम मुंडे या गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. याकरिता त्या पीपीई कीट घालून अनेक रुग्णालयात गेल्या होत्या. स्वत: डॉक्टर असलेल्या भाजप खासदार मुंडे यांनी कोरोना रुग्णांशीही संवाद साधला होता. पण आता खा.मुंडे यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. या संदर्भातली माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आरटीपीसीआर निगेटीव्ह आली असल्याचेही सांगितले आहे. पण लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर प्रीतम मुंडे यांचे चुलत बंधू तथा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांना सोशल मीडियावरून सल्ला दिला आहे. ट्विटमध्ये धनंजय म्हणतात की, ‘बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो’.
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले.
ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या.
प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो. @DrPritamMunde— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 24, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा आणि राज्यातील रेमडेसिवीर, लसीकरणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्विटरवॉर रंगले होते. यावेळी दोघा बहिणभावांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. धनंजय यांनी पंकजा यांच्यावर टीका करताना खा.मुंडे यांनाही वादात ओढले होते. पण त्यावेळी प्रीतम यांनी मौन बाळगले होते. पण त्यानंतर धनंजय यांनी प्रीतम यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- वैजापूर तालुक्यात भरदिवसा अवैध वाळू विक्रीस जोर!
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- ‘मोदींनी ९ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला’
- नाचनवेल चौफुली बनली अपघाताचे स्थळ
- हिंगोली जिल्ह्यातील कोव्हिशिल्ड संपले, कोव्हॅक्सिन देखील संपण्याच्या मार्गावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

