Share

हिंगोली जिल्ह्यातील कोव्हिशिल्ड संपले, कोव्हॅक्सिन देखील संपण्याच्या मार्गावर

Published On: 

हिंगोली : जिल्ह्यामधील ३३ केंद्रामधील कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन हे दोन दिवसांपुर्वी संपले आहेत. तसेच कोव्हॅक्सिन ही लस देखील संपण्याची परिस्थिती आली आहे. या दोन्ही डोस बाबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला आहे.

दोन ते तीन दिवसांपासून जिल्हामध्ये तीन दिवसांपासून ३३ केंद्रावरील कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन डोस संपले आहेत. या डोस संपण्याअगोदर सरकारकडे पत्रव्यवहार देखील केला आहे. आता मात्र कोव्हॅक्सिन डोस संपण्याची परिस्थिती आहे. अंदाजे १ हजार २०० डोस शिल्लक आहेत. फक्त दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक राहिलेला आहे. आत्तापर्यंत कोव्हॅक्सिन डोस १० हजार ९७५ तर कोविशिल्डचे ३९ हजार ९६७ डोस नागरिकांना दिलेले आहे.

लसीकरणाबाबत हिंगोली शहरासह जिल्हाभरातील नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोलीकरांचा लसीकरणाबाबतचा उत्साह पाहून जिल्हा प्रशासनाने दोन्ही डोस लवकरात लवकर मागवून ते कसे येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे या वेळी प्रयत्न केल्या जात आहेत. कारण हिंगोलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खुप मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण देखील खुप वाढत चालेल्याने हिंगोलीकरांची चिंता वाढवणारी परिस्थिती दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!