वैजापूर : तालुक्यातील गोदापात्रातुन वाळू चोरी करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत पोलीसांनी दोन लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई शुक्रवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी गणेश शिवाजी बाजरे, रा.नांदूरढोक याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडगाव ते वैजापूर रस्त्याने एक इसम त्याच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये गोदावरी नदीमधून वाळूची चोरी करून वाळु विकण्यासाठी नेत असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी खबऱ्यामार्फत त्यांना मिळाली. माहिती मिळताच सफौ रजाक शेख, राहूल थोरात, योगीराज वाघमोडे आदींच्या पथकाने सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास नगीनापिंपळगाव फाटा येथे जाऊन सापळा रचला. यावेळी माहितीतील निळया रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच २० सीआर ०७४६ येतांना पथकाला दिसले.
पथकाने चालकाला वाहन थांबवण्यास सांगितल्याने त्याने ट्रॅक्टर थांबविला. दरम्यान पोलीसांनी ट्रॉलीची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. पोलीसांनी चालकाला अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गणेश बाजरे असल्याचे सांगून वाळूची कुठल्याही प्रकारची कागदपत्रे आपल्याकडे नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी पोलीसांनी ट्रॅक्टर व वाळु असा एकूण दोन लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून चालक गणेश बाजरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- ‘मोदींनी ९ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला’
- नाचनवेल चौफुली बनली अपघाताचे स्थळ
- हिंगोली जिल्ह्यातील कोव्हिशिल्ड संपले, कोव्हॅक्सिन देखील संपण्याच्या मार्गावर
- कोरोनाचा कहर! सुपर स्पेशालिटीमध्ये एकाच स्ट्रेचर वर दोन रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

