परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बाकी असताना सुद्धा महाविकास आघाडीच ठरलेलं दिसत नाही आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एका जागेवरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
समोरच्या उमेदवाराने अर्ज परत घ्यावा, यासाठी आग्रह धरला दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला जात आहे. दोन्ही नेते आपल्या मागणीवर ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एकसंघ वाटत असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता पर्यंत एकत्र वाटणारी महाविकास आघाडीमध्ये आता वाद निर्माण होत आहे. लवकरच या वादाचे निराकरण न झाल्यास येणाऱ्या काळात आघाडीवर संकट ओढवू शकते.
विशेष म्हणजे आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन आरोप – प्रत्यारोप केले गेले, त्यांच्याच सोबतीने जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करू व त्यात यश मिळवू, असा ठाम विश्वास खासगी बैठकांमधून नेते मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. बुधवार हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी दुपारी ३पर्यंत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याचा दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर भविष्यात परिणाम दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यने ‘कोरोना’ त्यांना स्पर्श करीत नसेल’
- सासऱ्यांच्या ट्विटला जावयाचा भन्नाट रिप्लाय ; सोशलवर ‘हे’ ट्विट ट्रेंड
- पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी आजपासून ‘मॉक टेस्ट’
- आयसीसी पुरस्कारातही भारताची इंग्लडवर मात; भारतीय खेळाडु सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट
- घाटीतील प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच भरणार; देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

