नांदेड : १० लाख रुपये द्या तुमच्या मुलीला नोकरी लावून देतो. असे आमिष दाखवत दोन अज्ञात व्यक्तींनी तालुक्यातील गोकुंदा येथील सेवानिवृत्त रेणूराव संभाजी मुनेश्वर यांच्याकडून २०१६ मध्ये तब्बल साडेआठ लाख रुपये उकळले. मात्र पैसे घेऊनही नोकरीबाबत कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे पाहून मुनेश्वर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
चांगल्या नोकरीचे अमिष दाखवत तब्बल ८ लाख ५० हजार उकळल्याची माहिती समोर येत आहे. तुमच्या मुलीला चांगली नोकरी लावून देतो. त्यासाठी १० लाख रुपये द्या. अशी मागणी दोन व्यक्तीनी केली. या मागणीला बळी पडत मुनेश्वर यांनी त्या आरोपीना साडेआठ लाख रोख दिले. पण पैसे दिल्यानंतर सुद्धा काही होत नाही. हे कळल्यावर आपली फसवणूक झाली त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र आरोपींनी तुम्हाला काय करायचे ते करा, पैसे परत मिळणार नसल्याचे सांगितले.
आरोपी इथेच न थांबता आम्ही आ. रवी राणा यांची माणसे आहोत, असे सांगत पोलिसांत तक्रार दिली तर तुम्ही जीवंत राहणार नाही अशी धमकीही दिली. अखेर या प्रकरणात रेणूराव मुनेश्वर यांच्या तक्रारीवरून किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक ५५० रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या
- ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन
- महसूल बुडाल्या प्रकरणी तहसीलदार सोनींवर कारवाई होणार; आ. दानवेंच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांचे उत्तर
- घाटीतील प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच भरणार; देशमुख
- आयसीसी पुरस्कारातही भारताची इंग्लडवर मात; भारतीय खेळाडु सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

