परभणी: नवीन अर्थसंकल्पात जिंतूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून सतत पाठपुरावा करून अखेर जिंतूर व सेलू तालुक्यात पुल आणि रस्ते विकासाच्या कामासाठी तब्बल ११२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली आहे. यामुळे त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या प्रयत्नाला यश आले म्हणावे लागेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१- २२ मध्ये आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी जिंतूर मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी सभागृहांमध्ये आवाज उठविला त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिंतूर आणि सेलू तालुक्यातील पूल व रस्त्यांच्या विकासासाठी ११२ कोटी रुपये एवढा निधी मंजुरी देण्याकरिता सहकार्य केले आहे.
मतदार संघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्रथमच मंजूर झाला असावा. त्यामुळे ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील अशी मतदारसंघातील जनतेला आशा आहे. या निधीमुळे येणाऱ्या महिन्यात जिंतूरमध्ये मोठी विकास कामे होतील. अशी अपेक्षा सध्या जिंतूरकर करीत आहेत. या कामांना लवकरात लवकर सुरु करावे. अशी मागणी यावेळी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- नोकरीचे आमिष दाखवत साडे आठ लाख रुपये उकळले
- परभणी डीसीसी निवडणूक; महाविकास आघाडीत जागेच्या वादावरून बिघाडी
- नांदेड ते जालना द्रूतगती मार्गासाठी ७ हजार कोटी, समृद्धी महामार्गाशी जोडणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

